History

More About History

ιι श्री वाघजाई माता प्रसन्न ιι

प्रगतीच्या वाटचालीकडे ..........श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ, सुरत ...........


शिक्षण, उद्योग व नोकरी निमित्ते कोंकण प्रांतातील कोंझर गाव ( रायगड जिल्हा ) ची मंडळी या गुजरात राज्यात येऊन स्थायी झाली. काही मंडळी तर महाराष्ट्र राज्याच्या स्वातंत्र्य पूर्वी स्थायी झाली आहेत. ब्रिटीश काळात ‘मुंबई राज्य’ महाराष्ट्र व गुजरात मिळून होते. त्यामुळे आपल्यां पूर्वजांना व्यवसाय व नोकरी निमित्ते या गुजरात राज्याची ओढ लागली असावी तसेच नवसारी, सोनगड, व्यारा, बडोदा येथे गायकवाडांचे अधिपत्य होते. त्यामुळे काही लोक सैनिक, पोलीस (नोकरी) निमित्ते येऊन स्थायी झाले होते. आज कोंझर गावचे ग्रामस्थ गेली ५ ते ६ दशके या सुरत शहरात रहात आहेत.


आपल्याला ऐतिहासिक वारसा व परंपरा आहेत, परंपरेनुसार आपण एकत्र आले पाहिजे, रुढीनुसार जवळीक साधली पाहिजे, ‘समाज’ म्हणून आपण संघटीत व्हायला हवं! ते आपले प्रश्न सोडविण्यासाठी, आपल खानदानी अस्तित्व टिकविण्यासाठी, आपली परंपरा, संस्कृती जपण्यासाठी या हेतूनेच सन १९५३ रोजी “ श्री कोंझर ग्रामस्थ मंडळ” या सेवाभावी मंडळाची सुरत शाखेची स्थापना करण्यात आली. या संघटनेने सुरत शहरातील कोंझर ग्रामस्थांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि यशस्वी झाला आहे. याचे श्रेय नक्कीच आपल्या पुर्वजांना, सर्व कार्यकर्त्यांना, समाज प्रेमी ग्रामस्थाना दयावे लागेल. आपण कुटूंब,सगेसोयरे म्हूणन जपत आलो, पण समाज म्हूणन न्हवे !


आज आपण सर्व ग्रामस्थाना एकत्र केले आहे. आपला परस्पर परिचय नात्याने अथवा व्यक्तिगत कार्यक्रमामुळे होत असतो. परंतु सामाजिक कार्यासाठी नव्हे ! आज आपण एक सामाजिक संघटना कोंझर ग्रामस्थांची, या सुरत शहरात उभी केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून सामुहिक लग्न पद्धती ( वधू-वर सूचक समिती) होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, हुशार विद्यार्थी तसेच एखाद्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या ग्रामस्थांचा सत्कार म्हणजेच ‘गुणगौरव सोहळा’, परस्पर परिचय व स्नेहवर्धन वाढविण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सारख्या कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थ मंडळ, सुरत करीत आहे. म्हणूनच आपल्याला “वेबसाईटच्या” माध्यमातून सर्व ग्रामस्थांची व कोंझर गावाची माहीती आपणास देत आहोत. काही मंडळी स्मरणिका छापून अशा प्रकारची माहिती देत असतात. आज आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे जाऊन “वेबसाईट” वरुन हि माहिती देत आहोत याचा नक्कीच आपण ग्रामस्थ्याना फायदा होईल.


प्रत्येक ग्रामस्थाने आपली ऐतिहासिक उज्वल परंपरा लक्षात ठेवावी व बदलत्या काळात प्रगतीच्या मार्गाचा ध्यास धरावा. ग्रामस्थाच्यात किंबहुना समाजात अनेक त्रूटी आहेत. ऐटीत जगने, स्वतःला मोठे समजणे, मराठा म्हणून फक्त मिरवणे, या मनोवृत्तीच्या द्रष्ट चमगतून समाजाने/ग्रामस्थांनी बाहेर पडावे आणि विज्ञानाची कास धरावी. या वेबसाईटच्या माध्यमातून आपणास कोंझर ग्रामस्थांची माहिती व इतर सामाजिक घडामोडी बाबत वृतांत देणार आहोत. ग्रामस्थ्यांची प्रगती होण्याची प्रतिज्ञा आम्ही घेतली आहे. प्रत्येक ग्रामस्थ चारित्र्य संपन्न व ध्येयवादाने झपाटलेला असावा. स्वबळावर प्रगतीच्या वाटेची कास धरणारा असावा.


कोकणातून आलेल्या या मराठयांची सांस्कृतीक ठेवण महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा वेगळी आहे. भाषा, साहित्य, देवादीदेव, लग्नविधी, सणवार, यात थोडाफार का होईना फरक आहे. आम्हाला आमच्यात माणुसकीचा अंश टिकवायचा आहे. आपला सांस्कृतीक ठेवा वेबसाईटच्या माध्यमातून जतन करायचा आहे व विकास साधायचा आहे. यासाठी या माध्यमातून लोकांना जागृत करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना कोकणच्या मावळ्यांनी फार मोलाची कामगिरी करून मदत केली. याची इतिहासात नोंध आहे. नायक मराठा हा आर्थिक दृष्ट्या मागासलेला असला तरी, सांस्कृतिक दृष्ट्या तो अंत्यत प्रगत आहे. आणि त्याचे जता आपल्याला संघटीत होऊन करायचे आहे. यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला जरुरी आहे.


सुरत येथे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. वार्षिक स्नेह समेलन व गुणगौरव सोहळा या कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटामाटाने साजरे केले जातात. या दिवशी सास्कृतिक कार्यक्रम (मनोरंजन) शैक्षणिक कार्यक्रमामध्ये विध्यार्थांच्या सत्कार व गुणगौरव समारंभ, वयोवृद्ध ग्रामस्थांचा सन्मान, भोजन समारंभ, अशा अनेक प्रकारचे आयोजन होत असते. पारंपारिक पद्धतीप्रमाणे गोकुळाष्टमी, सार्वजनिक गणेशोत्सव, दसरा संमेलन, महाशिवरात्री असे सन सुरत शाखेकडून मोठया प्रमाणात साजरे केले जातात.


परप्रांतात राहून कोंझर ग्रामस्थ मंडळ, सुरत शाखेने स्थानीक ग्रामस्थांच्या प्रगतीसाठी उदारहस्ते आर्थिक मदत केली आहे, आणि करत आहेत. शैक्षणिक बाबतीत सांगायचे झाले तर जिजामाता माध्यमिक विद्यालयासाठी सुरत शाखेने मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली आहे.


सन २००६ रोजी झालेल्या महापुरामुळे अतोनात नुकसान झाले. त्यावेळी मंडळाने राहत निधी फंड उभा करून आर्थिक निधीची मदत केळी. तसेच सन २००६ रोजी सुरत येथे आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबाना आर्थिक फटका पडला होता. अशा गरजू लोकाना स्थानीक ग्रामस्थ, श्री वाघजाई माता तरुण मित्र मंडळ व मा. आमदार माणिकराव जगताप यांनी आर्थिक मदत केली होती.


तसेच गावाच्या विकासासाठी म्हणजेच गटर लाईन, सार्वजनिक शौचालय यासाठी सुरत शाखेने मोठया प्रमाणात आर्थिक मदत केली.


आज हे मंडळ उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेकडे वाटचाळ करीत आहे. स्थानिक गाव मंडळी, मुंबई, महाड, रोहा, बडोदा, अहमदाबाद या सर्व शाखा एकत्र येऊन कोंझर गावाचे नाव रोशन करीत आहे. आज हे मंडळ सर्वांच्या सहकार्यांने, विश्वासाने सर्वांची मन जिंकून सातत्याने काम करीत आहे. त्याना तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाची अपेक्षा........


जय महाराष्ट्र ......................................................जय जय गरवी गुजरात